राज्यात आजही पावसाची शक्यता!…’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अ‌लर्ट जारी…

फोटो- सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – राज्यात आजही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं विदर्भ, सलंग्न मराठवाडा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होईऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट जारी केला आहे.

उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना पावसाचा इशारा देण्यात आला आहे…

नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 17 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here