विदर्भाच्या ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता….हवामान विभागाची माहिती

न्यूज डेस्क – राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झालं मात्र अनेक ठिकाणी पावसानं दडी मारल्याने विदर्भात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलीच नाही. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूननं राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण राज्यात मान्सून वापसी व्हायला आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. राज्यात मान्सूननं ब्रेक घेतल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे.

कालपासून राज्यात मान्सून पूर्वपदावर येण्याचे संकेत हवामान विभागाकडून मिळत आहे. नागपूर हवामान विभागाने विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काल आणि आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहे. पण पुढील तीन तासांत मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन तासांत दमन, पालघर, डहाणू, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here