राज्यात ‘या’ जिल्ह्यात ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता!…IMD

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेक – राज्यात येत्या ४ ते 5 दिवसात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे मुंबई IMD चे केएस होसलीकर यांनी ट्वीट केले आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 आणि 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं माहिती दिली केलं होतं.

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे. राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाची परिस्थती कायम राहणार आहे.


अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले आहे. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही

आज विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट
आता पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here