विदर्भात ‘या’ जिल्ह्यात ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता !…


काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात कमी दाब क्षेत्राचे रुपांतर आता तिव्र डिप्रेशन(वादळ) मध्ये झाले असून हे वादळ ओरिसा च्या चांदबालीजवळ आज सकाळी होते. हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे छत्तीसगड-मध्य प्रदेश मार्गाने जाणार असुन १६ सप्टेंबर ला याची तिव्रता कमी होईल. याचा प्रभाव विदर्भावर आज आणि उद्या राहणार आहे त्यानंतर विदर्भातील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होईल.

१३ सप्टेंबरःविदर्भात सर्व जिल्ह्यात ह/म पावसाची शक्यता…भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व अमरावती सह उर्वरित विदर्भात गडगडाटासह विजांसह पाऊस

१४ सप्टेंबरःविदर्भात बरेच ठिकाणी ह/म पावसाची गडगडाटासह शक्यता अमरावती, अकोला, चंद्रपूर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.

१५,१६,१७ सप्टेंबर विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता…

१८ सप्टेंबर पासून पावसाचे प्रमाण बरेच कमी होईल…
प्रा.अनिल म बंड
श्री.शी. कृषी महा.अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here