दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला तब्बल 71 दिवस होऊनसुद्धा केंद्र सरकारकडून शेतकरा विरोधी करण्यात आलेले कायदे मागे घेण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दर्यापूर येथे संयुक्त किसान मोर्चा संघर्ष समितीच्या वतीने शनिवार रोजी बारा वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते….
हे आंदोलन तब्बल एक तास चालल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची रांगच रांग लागली होती. केंद्र सरकारने जर शेतकऱ्याच्या विरोधात केलेले तीनही कायदे मागे न घेतल्यास पुढे यापेक्षाही सुद्धा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात छेडण्यात येईल.
असा इशारा संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने तहसीलदार योगेश देशमुख यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी डॉ. अभय गावंडे, रवी कोरडे, एडवोकेट अभिजीत देवके, सुनील गावंडे, प्रवीण कावरे, अमोल गहरवाल, अनिरुद्ध घाटे, नमित हूतके, गणेश साखरे, आधी किसान मोर्चाचे शेतकरी बांधव आंदोलनावेळी उपस्थित होते.