चाकण मानव अधिकार महासंघ महिला आघाडीकडून गरिबांना धान्य वाटप…

राजगुरूनगर ( पुणे ) : कोरोनाच्या कहर मुळे गोरगरीब लोकांच्या हाताला रोजगार नसल्याने त्यांची उपासमार होऊ नये यासाठी चाकण मानव अधिकार महासंघ महिला आघाडीच्या वतीने शहरातील गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्षा संगिता नाईकरे,नलीनी चव्हाण,सिमा साळसकर ,किरण भोवरे,तालुका अध्यक्षा महानंदा चव्हाण,अनुराधा बोचरे , गिताजंली भस्मे,रंजना फुलारी, रंजना चने,मुक्ता ईनामदार आदी महिला उपस्थित होत्या.

संगीता नाइकरे यांनी सांगितले की, चाकण एमआयडीसीमध्ये मोठ्या संख्येने परजिल्ह्यातील गोरगरीब लोक नोकरी धंद्यासाठी आले आहेत. परंतु सध्याच्या कोरोनाच्या कहर मुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांची उपासमार होऊ नये यासाठी चाकण मानव अधिकार महासंघ महिला आघाडीकडून मदत केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here