तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांसाठी तेल्हारा बार असोसिएशनचे साखळी उपोषण सुरू..!

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर सह चेतन दही

तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्थेत बद्दल का बार असोसिएशनचे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी अकोला यांना तहसिलदारामार्फत निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती ची मागणी केली.

मागणी मंजूर न झाल्याने दिनांक 18 ऑक्टोंबर पासून तेल्हारा गाडेगाव रस्त्यावर साखळी उपोषण करण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला होता. तसेच वेळप्रसंगी तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कायदेशीर लढा सुद्धा देणार असल्याचे वकील संघाने सांगितले होते. तालुक्यातील रस्ते अनेक वर्षापासून खोदकाम करुन ठेवले आहेत. परंतु पुढील कारवाई बंद झाली आहे.

त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावरून दळणवळण करणे अशक्य झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तेल्हारा तालुक्यातील बरेच लोकांना जीवघेणे अपघात झाले असून. रस्त्याच्या धुळीमुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तेल्हारा आगार तसेच इतर प्रवासी वाहतूक व दळणवळण बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

विशेषता तेल्हारा गाडेगाव रस्त्यावर तालुक्यातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय व न्यायालय असून. तेथे रस्त्यामुळे नागरिक तसेच पक्षकार यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वीसुद्धा तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी रस्त्याबाबत विविध प्रकारचे आंदोलन केले आहे. परंतु प्रशासनाने त्याची कोणतीच दखल घेतली नाही व आजुन पर्यंत रस्त्याचे काम चालू केले नाही.

रस्त्याच्या तालुक्यातील बंद असल्या मुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे येणाऱ्या वकील संघ 9 ऑक्टोंबर रोजी सभा आयोजित करून रस्त्याबाबत चर्चा करून 18 ऑक्टोंबर पासून तेल्हारा गाडेगाव रोडवर साखळी उपोषण करण्याचे सर्वानुमते ठरविले होते.

म्हणतात तसेच संबंधित विभाग ठेकेदार अधिकारी यांच्याविरुद्ध दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिली असता त्यावर काहीही मार्ग न निघाल्याने अखेर बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सदस्य सर्व वकील संघ 18 ऑक्टोंबर पासून दिवाणी न्यायालय तहसील गाडेगांव रोड वर साखळी उपोषण सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here