आजपासून अकरावी प्रवेशासाठी CET रजिस्ट्रेशन…अशी करा नोंदणी

न्यूज डेस्क – गेल्या दोन दिवसआधीच दहावीचा निकाल लागल्यानंतर आता अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. मात्र यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच 19 जुलैपासून सुरू होत आहे.

CET  म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेच्या मार्क्सवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे.

अशाप्रकारे करा नोंदणी

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला ओपन करा.

या वेबसाईटवर तुम्हाला CET बाबतची लिंक दिसेल.

दहावीचा रोल नंबर टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.

त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील.

यापैकी योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा. येथे क्लिक करा CET Exam Registration

9 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here