मूर्तिजापूरात सेल टॅक्स आणि व्हॅट टॅक्स कार्यशाळा संपन्न…

मूर्तिजापूर (प्रतिनिधी)
वस्तू व सेवा कर विभाग अकोला द्वारा मूर्तिजापूर शहरातील समस्त व्यापारी बांधवां करिता आता भय नाही ..अभय योजना 2022 वस्तू व सेवा कर यांच्या माहितीकरिता एक कार्यशाळेचे आयोजन लक्ष्मीलीला भवन मूर्तिजापूर येथे करण्यात आले होते .सदर कार्यशाळेत राज्य कर अधिकारी मिलिंद खुणे, सचिन लव्हाळे तसेच राज्य कर निरीक्षक जितेंद्र अंबेकर ,सचिन केळकर यांनी वस्तू व सेवाकर अभय योजनेची व्याख्या,परिपत्रक,संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.

३०जुनं२०१७ पूर्वीच्या सर्व मुंबई विक्री कर,केंद्रीय विक्री कर,मूल्यवर्धित कर मधील थकबाकी दारासाठी शासनाने घोषित केलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
सदर कार्यशाळेत किराणा असोसिएशनचे अशोक भावनांनी, भूषण सोमानी, अनिल चतरेजा, इंडस्ट्री असोसिएशनचे अनुप अग्रवाल, जिया सुफियान विजय हुंदानी, हॉटेल असोसिएशनचे अनिल जेठवाणी, महादेवराव पवार, एजन्सी असोसिएशनचे सुशील शर्मा ,सतीश शर्मा, बंटी मोटवानी, कटलरी असोसिएशनचे बंटी बालानी, कपडा असोसिएशनचे मनोहर हुंदानी, काका सेठ ओबेराय , स्टेशनरी असो चे चंदन अग्रवाल तसेच कर सल्लागार भूषण अग्रवाल ,अशोक राजपाल, सनदी लेखापाल सुमित राजपाल इत्यादी उपस्थित होते

कार्यक्रमाचे संचलन अशोक राजपाल यांनी तर आभार सतीश शर्मा यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here