कोगनोळीत राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील स्टॅन्ड सर्कल गणेश मंदिर शेजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती कोगनोळी ग्रामस्थ व प्रजावणी फाउंडेशनच्या मार्फत साजरी केली.

यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण अरिप शिरगुप्पे यांच्या हस्ते करण्यात आले तर रघुनाथ माने गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवले .स्वागत व प्रास्ताविक नरजित विटे यांनी केले.

यावेळी लक्ष्मण जगताप यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या कार्याचा आढावा देतांना म्हणाले एका सामान्य कुटुंबातुन संत गाडगेबाबा महाराज होते.त्यांनी जे समाजाचे कार्य केलं ते खरोखरच कार्य वतन होते. समाजातील समस्या अडीअडचणी अंधश्रद्धा दूर करण्याचं काम त्यांनी केले.

त्यांच्या कार्याची महानता एवढी आहे की महाराष्ट्रा पुरते मर्यादित कार्य करीत नव्हते तर महाराष्ट्राबाहेर देशाच्या कानाकोप-यात मध्ये संत गाडगेबाबांना आज आपण ओळखतो. 1876 सली अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे त्यांचा जन्म झाला होता.

आज 2021 मध्ये देखील आपण त्यांच्या विचारांचे स्मरण करतोय. यावरून त्यांचे महत्त्व आपल्याला जाणवतंय. संत गाडगेबाबा यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असं होते…….

यावेळी विठ्ठल मुरारी कोळेकर, संतोष माने ,दत्ता परीट, बबलू पाटील, विनोद ढोबळे ,आनंदराव हंचनाळे यांच्यासह कोगनोळी येथील बहुजन समाजातील अनेक महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता .

शेवटी आभार सचिन परीट यांनी मानले.आजच्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील उपस्थित नागरिकांनी मराठी मुला मुलींची शाळा कोगनोळी शेजारच्या परिसरातील स्वच्छता केली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here