रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील तथा रामटेक – मनसर मार्गावरील गट ग्राम पंचायत खैरी बीजेवाड़ा अंतर्गत येणाऱ्या खैरी गावात माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.दरम्यान यावेळी समाज प्रबोधन म्हणुन ऑस्कर नॉमिनेटेड मूवी जयभीम एलईडी स्क्रीन वर दाखविण्यात आली. तत्पूर्वी बुद्ध विहार मध्ये माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या फोटो ला माल्यार्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी लक्ष्मी राजकुमार खोब्रागडे यांनी माता रमा बाई यांच्या केलेल्या कार्यावर माहिती ग्रामस्थांना दिली. कार्यक्रमात यावेळी शिवाजी राऊत, नरेंद्र राऊत, सुनील खोब्रागडे, नंदा परतेती, प्रिया खोब्रागडे, साहिल कुंभरे, सीमा परतेती, आदित्य खोब्रागडे, अंजना खोब्रागडे, दीपक कोडवते, संघर्ष मेश्राम, सीता लांजेवार, दिनेश रंगारी, सानू लांजेवार, पलाश खोब्रागडे, निहाल खोब्रागडे, सुमेध खोब्रागडे, सत्या परतेती व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक राजकुमार खोब्रागडे मित्र परिवारद्वारे करण्यात आले.