काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी…

राजु कापसे
रामटेक

आज दि. ३० जानेवारी ला माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या जनसंपर्क कार्यालयात वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा दिवस संपूर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रामटेक शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आज श्री राजेंद्र मुळक यांचे जनसंपर्क कार्यालय, रामटेक येथे सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी श्री कैलास राऊत अध्यक्ष रामटेक तालुका काँग्रेस कमिटी, श्री दामोधर धोपटे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी तथा नगरसेवक नगरपरिषद रामटेक , श्री रमेश बिरणवार गुरुजी अध्यक्ष रामटेक तालुका सेवादल काँग्रेस, श्री राहुल कोठेकर अध्यक्ष युवक काँग्रेस, श्री अभिषेक डहारे अध्यक्ष रामटेक तालुका काँग्रेस कमिटी (असंघटित कामगार विभाग) ,श्री भीमा नागपुरे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी (असंघटित कामगार विभाग), श्री बबलू दूधबर्वे उपाध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी, सौ आम्रपालीताई भिवगडे उपाध्यक्ष रामटेक तालुका महिला काँग्रेस तथा सदस्य ग्रामपंचायत सोनेघाट, श्री विनायक तुरक, प्रा. प्रताप येरपुडे, प्रा. उमेश पोकळे, श्री चंद्रशेखर (पिंटू) भोयर गुरुजी, श्री वसंत दुंडे, श्री अन्वर (अनु) बेग, श्री उद्धव बर्वे, श्री अविनाश कोल्हे, श्री अश्विन सहारे, श्री भोजराज सांगोळे, श्री कैलास बागडे, श्री श्रीराम महाजन, श्री देविदास नागुलवार, श्री भूषण दमाहे, श्री मयूर खंडाते, श्री आशिष नागपुरे, श्री हेमंत कुंभारे, श्री सागर धावडे, श्री सुमित कुकडे, श्री खरकाटे काका प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here