लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती ग्राम पंचायत दानापूर येथे साजरी…

दानापूर – गोपाल विरघट

थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा इतिहासातील अनमोल ठेवा. फक्त दिड दिवसच शाळेत जाऊन.१३ लोकनाट्य , ३नाटके, १४ कथासंग्रह, ३५ कादंबऱ्या, १ शाहीरी पुस्तक,१५ पोवाड़े, १ प्रवास वर्णन, ७ चित्रपठ कथा. असेअनेक कथासंग्रह,जवळपास शेकडो पोवाडे,लावण्या,माझा रशीयाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे विविध व विपूल साहित्य लिहीणारे.

छत्रपती शिवरायांची किर्ती पोवाडयातुन पोहचवणारे कष्टकरी,श्रमवादी,गरीब भटकयांना आपल्या साहित्यात स्थान देऊन मराठी साहित्यात अजरामर झालेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज दानापूर ग्राम पंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली यावेळी.सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पन माजी.जि.प.सदस्या सौ.दिपमालाताई रविन्द्र दामधर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रविन्द्र दामधर यांनी थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले.यावेळी ग्रा.पं.सदस्य गोपाल विखे, रविन्द्र तायडे ग्रा.पं. सदस्य, योगेश येऊल ग्रा.प.सदस्य,धम्मपाल वाकोडे,शुभम अढाव,अविनाश गवई, रघुनाथ दुतोंडे,काशीनाथ दुतोंडे, अनुप दुतोंडे, प्रल्हाद दुतोंडे, गोपाल दुतोंडे,

नितेश घोड़े, गोपाल विरघट, परसराम विरघट, संजय वसंता हागे,विनोद अढाव, संजय सोनाजी दुतोंडे, परशुराम वानखड़े, चैतराम दुतोंडे, प्रकाश दुतोंडे, रामकृष्ण हागे, अविनाश जामोदकार,गणपतजी रौदळे,उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविन्द्र दामधर सर तर आभार प्रर्दशन काशीनाथ दुतोंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here