कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता.निपाणी येथे प्रजावाणी फौंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती आज दि.2 रोजी साजरी करण्यात आली.यावेळी प्रजावाणी फाऊंडेशनच्या वतीने धनगर समाजाच्या कार्यालया मध्ये श्री महादेव मानकु पाटील यांच्या हस्ते प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच लक्ष्मण जगताप यांनी प्रजावाणी फाऊंडेशनचे दिवंगत कार्यकर्ते नारायण कोळेकर यांना आदरांजली वाहून महात्मा गांधी यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
व आज गांधी जयंती निमित्त उपस्थित लोकांच्या वतीने येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली.
याप्रसंगी प्रजावाणी फौंडेशनचे कार्यकर्ते विठ्ठल कोळेकर, नितिन कानडे, सचिन परीट, माजी ग्राम पंचायत सदस्य झाकीर नाईकवाडे, विजय जाधव, शिवाजी माने, संतोष माने, शिवाजी दिवटे, पोपट पसारे , अरुण पाटील, नरजीत विटे, गंगाराम चकाटे,

महालिग कोळी, तसेच महिला वर्गातून सौ महादेवी परीट, सौ मनिषा परीट, कु समिक्षा कोळी, सौ मेघा कोळी तसेच धर्मस्थळ बचत गटाच्या महिला व इतर ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.