मातोश्री शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ द्वारा संचालित यूथ केअर फाउंडेशन मूर्तिजापूर तर्फे राज्य परिवहन महामंडळ मुर्तिजापूर येथील आगारात संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुर्तिजापूर आगर व्यवस्थापक श्री अंबुलकर साहेब श्री कमलाकर गावंडे (समाजसेवक) श्री भुषण कोकाटे (तालुकाध्यक्ष भाजप) श्री अतुल इंगळे श्री राहुल वानखडे (अध्यक्ष यूथ केअर फाउंडेशन) यांचे हस्ते रविदास महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री राहुल वानखेडे यांचे कडून संत शिरोमणी रविदास महाराज जयंती व नामदार ॲड श्री संजयजी धोत्रे राज्यमंत्री भारत सरकार यांचा वाढदिवसानिमित्त आगारातील सर्व कर्मचारी बंधू करीता मास्क चे वाटप करण्यात आले . यावेळी श्री गौरव पवाडे श्री संतोष घोगरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधीर पाखले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रवीण धामणे यांनी केले या वेळी आगारातील सर्व कर्मचारी बंधू उपस्थीत होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.