सांगली भाजपा शहर वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

सांगली – ज्योती मोरे

रविवार दि. २३ जानेवारी २०२२ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहाने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या थोर नेत्यांची जयंती साजरी करण्यात आली.

“महाराष्ट्राने गेल्या शंभर वर्षात अनेक थोर आणि लोकप्रिय नेते पहिले असतील पण हिंदूहृद्यसम्राट या नात्याने कै. बाळासाहेबांना जी लोकप्रियता लाभली, तशी लोकप्रियता अन्य नेत्यांना मिळाली नाही. हाताशी कोणतीही आर्थिक सत्ता नसताना केवळ वकृत्वाच्या जोरावर बाळासाहेबांनी मराठी माणसांची मने जिंकली. महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकवण्याचे त्यांनी स्वप्न पहिले आणि महाराष्ट्रभर प्रवास करून आपल्या वाणीने ते स्वप्न पूर्ण केले.

तसेच बंगालमधल्या अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित कुटुंबात जन्म घेवूनही भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट घेणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे सर्व भारतीयांसाठी आदराचे स्थान ठरले आहेत. आझाद हिंद सैन्याची स्थापना करताना आवर्जून महिला सैनिकाची स्वतंत्र फौज उभारणारे नेताजी हे दूरदर्शी नेते होते. आज प्रत्येक भारतीय या दोन थोर नेत्यांच्या प्रती नतमस्तक आहे.” असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रतिमेस अभिवादन करताना मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे, समाजकल्याण सभापती सुब्रावतात्या मद्रासी, माजी महापौर संगीताताई खोत, गटनेते विनायक सिंहासने, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजित पाटील, गौस पठाण, गणपती साळुंखे, विशाल मोरे, शांतीनाथ कर्वे, युवती मोर्चा संयोजिका दिव्या कुलकर्णी, अनिकेत खिलारे, अमित गडदे, बाळासाहेब बेलवलकर, शीतल कर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here