किराणा किटचे वाटप व वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा…

मुर्तिजापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुर्तिजापूर येथील नंदनवन कुष्ठधाम पारधी नगर येथे कुष्ठरोग्यांना किराणा किटचे वाटप करून व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरजी बाळबुधे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे,आमदार अमोलदादा मिटकरी,मा.आमदार भैय्यासाहेब तिडके,

प्रा.तुकाराम बिडकर,हरिदासजी भदे,बळीरामजी सिरस्कार,मा.जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील,ओबीसी सेल निरीक्षक राजू गुल्हाने,प्रदेश सरचिटणीस सदाशिवराव शेळके यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी सेल जिल्हा महासचिव किशोर सोनोने,तालुकाध्यक्ष विष्णू लोडम,शहराध्यक्ष विशाल शिरभाते यांनी केले होते.

यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,राकॉ तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर,सेवादल शहराध्यक्ष रामेश्वर जामनिकर,जि.प.सदस्य नरेश विल्हेकर,महिला जिल्हाध्यक्षा सुषमा कावरे,जिल्हा उपाध्यक्षा रंजना सदार,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुवर्णा सपकाळ,ता.सचिव संगीता टापरे,महानगर युवती सचिव मयुरी कडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here