शासकीय कार्यालयांची स्वच्छता करून श्रमजीवी सेवा दलाचा स्वावलंबन दिन साजरा…

ठाणे,पालघर,नाशिक आणि रायगड जिल्ह्यात स्वावलंबन दिन उत्साहात साजरा साजरा.

सेवा दलाची स्वामी विवेकानंद यांना आगळीवेगळी आदरांजली.

उसगाव – ठाणे,पालघर ,रायगड आणि नाशिक जिल्ह्यात श्रमजीवी सेवादल मार्फत आज स्वावलंबन दिन साजरा करण्यात आला. सर्व तालुक्यातील श्रमजीवी सेवा दल सैनिकांनी पंचायत समिती ,तहसिल कार्यालय, पोलिस ठाणे तसेच इतर सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्या अनुषंगाने आज स्वावलंबन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वामी विवेकानंद आणि पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, तब्बल तीन तासाच्या साफ सफाई नंतर या तरुण सैनिकांनी त्या त्या कार्यलयाच्या प्रमुख अधिकारी यांच्याकडून श्रम मूल्य म्हणून स्वलंबन निधी घेतला.

या निधीचा वापर गावातील सेवादल शाखा आणि मुलांच्या शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. या अभिनव कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये श्रमाची, स्वालंबनाची भावना निर्माण होण्यास मदत झाली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून आलेल्या या अभिनव उपक्रम श्रमजीवी सेवा दल सैनिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

प्रत्येक तालुक्यात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सर्व तालुक्यातील सेवा दलाचे सैनिक एकत्र येऊन स्वामी विवेकानंद आणि पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमांची पूजा करून, श्रमजीवी ध्वज फडकवून श्रम करताना दिसले. शासकीय कार्यालय परिसर झाडू घेऊन स्वच्छ केला गेला.शासकीय कार्यालचे दरवाजे, खिडक्या स्तंभ, स्मारक तसेच तेथील कचरा स्वच्छ करण्यात आला.

या केलेल्या श्रमाच्या बदल्यात येथील कार्यालय प्रामुख यांच्या कडून श्रमाचा मोबदला म्हणून स्वावलंबन निधी म्हणून श्रम मूल्य मागण्यात येणार आहे. सैनिकांनी केलेल्या श्रमाच्या मोबदल्यात जे काही श्रममूल्य मिळेल ते आता सेवादल सैनिक आपल्या गावातील शाखेसाठी वापरतील.

येत्या काळात प्रत्येक महिन्यातुन एक दिवस असा कार्यक्रम होणार आहे. ज्यातून मुलांना श्रमाची सवय आणि त्याचे मूल्य कळेल, यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून स्वालंबी होण्याची भावना निर्माण होईल. प्रत्येक महिन्यात असा श्रम कार्यक्रम यापुढे श्रमजीवी सेवा दलमार्फत होणार आहे.

“भविष्यात या सेवादल सैनिकांना आपल्या शिक्षणासाठीही पैसे उभे करताना कमवा आणि शिका या भावनेतून श्रम करून शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल” असे या निमित्ताने श्रमजीवी सेवा दल प्रमुख आराध्या पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here