कोगनोळीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

राहुल मेस्त्री
कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रजावणी फाउंडेशनच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम कोगनोळी येथील धनगर समाज सामुदायिक भवन या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाचे स्वागत राहुल गायकवाड यांनी केले.

तर प्रास्ताविक करताना लक्ष्मण जगताप यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ प्रियंका मगदूम या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका पुष्पा पाटील होत्या.. आजच्या या महिला दिनानिमित्त या ठिकाणी संगीत खुर्चीचे देखील आयोजन केले होते.

यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या पूजा शामराव पाटील यांना पैठणी साडी देण्यात आली, द्वितीय क्रमांक येणाऱ्या तेजस्वी संतोष लोखंडे यांना कुकर देण्यात आला, तृतीय क्रमांक येणाऱ्या संध्या शिवाजी सूर्यवंशी यांना स्टील बादली देण्यात आली. चतुर्थ क्रमांक येणाऱ्या अश्विनी आप्पासो पाटील यांना आरती सेट देण्यात आला.

आणि पाचवा क्रमांक आलेल्या योगिता सुनील गिरगावे यांना स्टील डब्बा देऊन अशाप्रकारे बक्षीस वितरण करण्यात आले… या कार्यक्रमाला डॉ वैशाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य विद्या व्हटकर, कमल पाटील ,अनुराधा यादव, बकुळाबाई पाटील, मंगल करनुरे ,विठ्ठल मु कोळेकर, सचिन परीट,

युवराज परीट ,अरुण पाटील, नरजित विटे, प्रवीण सुतार, संजय पवार ,सूनील अब्दगिरे आणि कोगनोळी येथील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांच्यासह शेकडो महिला व प्रजावणी फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here