मोफत रुग्णसेवा देऊन जन्म दिवसाचा आनंदोत्सव साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय…!

चिखली :- दीपक साळवे

चिखली तालुक्यातील मौजे ग्राम मकरध्वज खंडाळा येथे माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय डॉक्टर शिवशंकर पडघान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खंडाळा वासियांना आला. सध्याच्या चालू असलेल्या कोरोणाच्या कठीण परिस्थितीत सर्व जनता ही कोरणा सारख्या आजाराशी तसेच पोटाची खळगी भरण्याच्या परिस्थितीशी झुंज देत असताना तसेच गोरगरिबांना दोन वेळच्या अन्नाची खंत असताना,

चिखली पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खंडाळा मकरध्वज येथील डॉ. शिवशंकर पडघान यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब जनतेला वाढदिवसावर होणारा खर्च टाळून गावकऱ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत रुग्णसेवा करण्याचा निर्णय डॉ. पडघान यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व गावकऱ्यांनी मनापासून स्वागत केले आणि डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनी दिल्या.

याबाबत सविस्तर असे की, रुग्णसेवा ही एक ईश्वरी सेवा (देन) म्हणावी लागेल. कारण आजारांमध्ये सर्वसामान्य जनता डॉक्टरांना सुद्धा देऊ रुपाने पाहते. रुग्णाला होत असलेली वेदना त्रास हे सर्व डॉक्टर एका गोळीने किंवा इंजेक्शनाणे थांबवतो त्यालाच रुग्ण देवरूपी मानतो असा प्रत्यय खंडाळा मकरध्वज येथील जनतेने अनुभवला.

निमित्त होते ते डॉक्टर शिवशंकर पडघान यांच्या वाढदिवसाचे. अनेक वेळा आपण वाढदिवसाच्या दिनी ओल्या पार्ट्या, सुक्‍या पार्ट्या, फ्लेक्स बोर्ड, हारतुरे हे पाहतो खरे परंतु डॉ. शिवशंकर पडघान यांनी आगळावेगळा उपक्रम साजरा करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मोफत रुग्ण सेवा करण्याचा संकल्प केला. आणि या संकल्पाचे सर्वांनी स्वागत करून डॉ. पडघान यांच्यावर आनंदाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.

या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. पडघान यांनी महाव्हॉइस चे चिखली तालुका ग्रामीण प्रतिनिधी दीपक साळवे यांच्याशी बोलताना सांगितले की, वर्षातून एकदा का होईना पण वाढदिवसाच्या निमित्ताने जी माझ्या हातून मोफत रुग्णसेवा घडली याचा मला मनस्वी आनंद आहे.

कारण सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वैद्यकीय सेवा ही वैद्यकीय सेवा. या निमित्ताने घडली याचे मी माझे भाग्य समजतो असे सांगितले. डॉ. पडघान यांनी मोफत सेवा दिली त्यामधून आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here