भीम जयंती आनंदाने व शांततेने घरीच साजरी करण्याचे आवाहन..!

चिखली – दीपक साळवे

भीम अनुयायांच्या जीवनातील व घरातील सर्वात आनंदाचा क्षण , तो म्हणजे 14 एप्रिल, कारण 14 एप्रिल 1891 या दिवशी शोषित पीडितांचे उद्धारक प्रज्ञासूर्य ,महामानव बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गरिबांच्या झोपडीत प्रकाशमान करणाऱ्या ताऱ्याचा जन्म झाला.

आणि तेव्हापासून 14 एप्रिल चा दिवस आंबेडकरी अनुयायांच्या जीवनातील प्रकाश मान करणारा दिवस ठरला. हा आनंदाचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला असल्यामुळे सध्या सर्वत्र कोरोना ने कहर माजवला आहे. त्यामुळे कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने घालून दिलेले सर्व नियम भीम अनुयायांनी पळून जयंती साजरी करावी असे आवाहन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई सिद्धार्थ पैठणे यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षापासून भीम जयंती महोत्सव कोरोनाच्या सावटाखाली आल्याने सर्वच भीम अनुयायांत तीव्र नाराजी सह संतापाची लाट होती हे खरे ! परंतु आपण जबाबदार नागरिक या नात्याने प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे कारण प्रशासन आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊन आपली काळजी करत आहे.

तरी सध्या गावागावात तयार झालेल्या उत्सव समित्यांना भाई पैठणे यांनी नम्र आवाहन केले की, आपण सर्वांनी covid-19 चे नियम पाळून भीम जयंती आनंदाने व शांततेने साजरी करावी की जेणेकरून प्रशासनाला सुद्धा आपला अभिमान वाटेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी भारतातच नव्हे तर जगभरात होत असलेल्या जयंतीला कोरोनाचे संकट आहे हेही तितकेच खरे ! परंतु आपले दायित्व समजून आपण प्रशासनाला सहकार्य करण्याचे नम्र आवाहन भाई सिद्धार्थ पैठणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here