भारतरत्न मौलाना अबुल कलाम जयंती “राष्ट्रीय शिक्षा दिन” साजरा न करणाऱ्या शासकीय कार्यालये, शाळांवर कारवाई करा…

नईम खान बागवान, जिल्हाधिकारीर्यांसह तहसीलदार, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन…

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचा शासकीय कार्यालये यांना विसर.

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन 11 नोव्हेंबर असून त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करावा असा अध्यादेश 2008 साली मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा अध्यादेशानुसार सूचना देण्यात आल्या होत्या.

तेव्हापासून मौलाना अबुल कलाम यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात आहे. परंतु बोदवड तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालये तसेच सरकारी व खाजगी शाळांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा न केलेले निवेदन निर्दशनास आल्यामुळे ज्या शासकीय कार्यालय व शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा न केलेला आहे.

अशांवरती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन नईम खान बागवान यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार शिक्षणाधिकारी यांना दिले.निवेदनात स्वातंत्र्यसेनानी,भारताचे पहिले शिक्षण मंत्री,भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन (११ नोव्हेंबर) “राष्ट्रीय शिक्षण दिवस” म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी ११ सप्टेंबर २००८ रोजी मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार द्वारे अध्यादेशानुसार सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार ११ नोव्हेंबर हा दिवस “राष्ट्रीय शिक्षण दिवस” म्हणून देशभरातील सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालय, शासकीय व खासगी शाळा,महाविद्यालय मध्ये मध्ये साजरा करण्यात येतो.परंतु आज घडीला बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आले की मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती शासकीय कार्यालय व शाळांमध्ये साजरी झाली नाही.

तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आहे की जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच सरकारी व खासगी शाळांकडून अहवाल मागवून आज ११ नोव्हेंबर २०२० रोजी मौलाना आजाद यांच्या जयंतीदिनी “राष्ट्रीय शिक्षण दिन” साजरा न करणार्या शासकीय कार्यालये तथा शाळा ह्या एका अर्थाने मौलाना आजाद यांची अवहेलना करत आहेत.

तरी जयंती साजरी न करणार्या शासकीय कार्यालये, व शाळांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here