वैनगंगा नदीकिनारी पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा…

गडचिरोली

गोसेखुर्द धरणामधून वेळोवेळी सोडण्यात येणारे अधिकच्या विसर्गामुळे (सध्या, वेळ दुपारी 12 वाजता विसर्ग 19524 क्युमेक्स 6.89 लक्ष क्युसेक्स) तसेच पुढे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता वैनगंगा नदीकिनारी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी अशा सुचना प्रशासनकडून देण्यात येत आहेत.

वैनगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे उपनद्या व नाल्यांमध्ये बॅकवाटर मुळे अंतर्गत व मुख्य रस्ते बंद होण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक ठिकाणी बॅरेकेडींग पोलीस विभागाकडून लावण्याचे कार्य सुरू आहे.

जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता सर्व तहसिलदार व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नदीकिनारी भागात वेळोवेळी अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

वैनगंगा व उपनद्यांच्या नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.नागरिकांनी नदीकिनारी जाणे टाळावे. सेल्फीचा मोह करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणत्याही प्रकारे पुल ओलांडू नये याबाबत सर्व स्तरावर सतर्क बाळगावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here