जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित प्रकरणात त्रुटीची पूर्तता करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत…

फोटो - सौजन्य गुगल

महेंद्र गायकवाड
नांदेड
माहे डिसेंबर 2021 अखेर जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये अर्जदारांना कागदपत्रांची त्रुटीची पुर्तता करण्यासाठी 1 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जदाराकडून या कालावधीत कागदपत्रांची त्रुटी पूर्तता न झाल्यास त्यांची प्रकरणे बंद करण्यात येतील. अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावा यांची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता शासनाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 1 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेतंर्गत नांदेड जात पडताळणी समितीकडे माहे-डिसेंबर 2021 अखेर शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर विषयक जाती दावा पडताळणीच्या प्राप्त झालेल्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा प्रकरणामध्ये ज्या प्रकरणात समितीने तपासणी केल्यानंतर कागदपत्रात पुराव्याअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत.

अशा सर्व प्रलंबित प्रकरणामध्ये संबंधित अर्जदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेशाद्वारे एसएमएस तसेच त्यांच्या ई-मेल आयडी वर ई-मेलद्वारे त्रुटीची पुर्तता करण्याबाबत संबंधित अर्जदारांना ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने कळविण्यात आलेले आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here