मुग, उडीत, सोयाबीन, तीळ, हे पिके सुद्धा गेली हातातून. तालुक्यातील शेतकर्यांची चिंता वाढली.
अकोट – कुशल भगत
अकोट तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे मुग, व सोयाबीन हे पिके या वर्षी पुर्ण पने मातीमोल झाले मुंग या पिकावर शेतकर्यांची मोठी अपेक्षा असते परंतु ते पिक सुद्धा हातातुन निघुन गेले व त्याच बरोबर सोन्यासारखे पीकणारे कपासीचे पिक सुद्धा आता अती पावसामुळे मातीत जात असताना दिसत आहे.
गेल्या एक महिन्यापासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने या परीसरातील कपासीच्या बोंडीला किंड लागायला सुरुवात झाली आहे, बोंड्या पाण्यामुळे सडत आहेत एका झाडाला किमान दहा ते बारा बोंड्या लागलेल्या आहेत पण रोज सूरु असलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे यंदा अकोट तालुक्यातील कपाशी उत्पादन शेतकर्यांना यांचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे.
कशाबशा झांडाना बोंड्या लागल्या त्या साठी शेतकर्यांना मोठी मेहनत करावी लागते झांडाना लेकरासारखे जपावे लागते ,रोप लहान असले कि त्यांना निंदन, खत, फवारनी, डवरा, एकुन एका एकराला किमान विस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो येवडा खर्च करूनही जर बोंड्या सडत असतील तर तोडांसी आलेला घास सुद्धा निर्सग हिसकावून घेत आहे,

शेतकर्यांना पहिला मार मुग, उडीत, या पिकांनी दिला व नतंर सोयाबीन बियानाने दिला पावसाची साथ मिळत असंतांना किडीने हल्ला केला चक्रीभुगां ,खोडकीडा, मर अशा रोगांनी मुग व सोयाबीन या पीकांना जग जग पछाडले व आता आशा होती कपाशी पीकांची ही आशा पण परतीच्या पावसाने शेतकर्यांना जनु रडुच आनले परिपक्क होण्याच्या अवस्थेत असताना बोंडीना मोठ्या प्रमाणावर पावसाळी वातावरणामुळे आद्रीता निर्माण झाली.
या अर्धवट परिपक्व बोंडीना अतिपाऊसामुळे किड लागली बोड्यां सडु लागल्या पाने व पाती गळतीला लागली अकोट तालुक्यातील पिकांची परिस्थितीत फारच चिंता जनक आहे कावसा, तरोडा, पळसोद, मरोडा, कुटासा, दनोरी, पनोरी, दिनोडा, पाटसुल, आलवाडी, रेल, धारेल,
या भागात रोजच पाऊस पडत असल्याने पाडरे सोने म्हणून ओळखले जाणारे कपासीचे पिक हातातून जाते कि काय अशी भिती या परीसरात तील शेतकर्यांवर वाटु लागली आहे जर काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर नक्की च कपासीचे पिक सुद्धा शेतकर्यांच्या हातातून जानार आहे असे या परीसरातील शेतकर्यां मधे बोलले जात आहे.