विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एक विरुद्ध गुन्हा दाखल…

बिलोली – रत्नाकर जाधव

तालुक्यातील मौ.चिंचाळा येथील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात आरोपी मारोती गोविंद पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोली पासून ५ कि. मी.अंतरावर असलेल्या मौ.चिंचाळा येथील एक २० वर्षीय तरुणी ७ एप्रिल रोजी चिंचाळा ते पोखर्णी रस्त्याकडे प्रांतविधी साठी मैत्रिणी सोबत गेली असता येथील मारोती गोविंद पाटील याने तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडून जबरदस्तीने “किस” करण्याचा प्रयत्न केला व “महारडगी”अशी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली अशी फिर्याद मुलीने बिलोली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध दिली.

तिच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम ३५४,३५४(३),३२३, ३२४, २९४, ५०६,भा.द.वी. व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायदा कलम ३(१)(आर) (एस),३(२)(व्ही)(ए),३(१)(डब्लू)(१),३(१)(डब्लू)(२) अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहे.

बिलोली शहरात चार महिन्यापूर्वीच एक मातंग मुलीचा बलात्कार करून खुन करण्यात आल्याची घटना ताजी असतांनाच परत विनयभंगाचा घटना घडली असल्याने पुन्हा विकृत बुद्धीच्या आरोपीने डोकं वर काढले असल्याने मुलींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here