वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० कोठा रद्द करा..!सम्राट मित्रमंडळाची शासनाकडे मागणी..!

अहमदपूर – बालाजी तोरणे

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी महाराष्ट्र मध्ये असलेला 70:30 चा कोठा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून तो तात्काळ रद्द करावा अशी आग्रही सम्राट मित्रमंडळा च्या वतीने युवकनेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.

येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30हा फॉर्म्युला असंवैधानिक असून मराठवाड्यातील डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवणार आहे. मराठवाड्याच्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालय अधिक आहेत.

अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या तेथे काही पटींनी अधिक आहे.महाराष्ट्रातील विभागवार जागांची स्थिती पाहता 70:30 च्या फार्मूल्यामूळे मराठवाड्यातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.मराठवाड्यातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण असलेले उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रवेशास पात्र होत आहेत.

त्यामुळे सहाजिकच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.सर्व वैद्यकीय महाविद्यालय एकाच विद्यापीठाशी संलग्न आहेत तसेच देशपातळीवरही सर्वांसाठी एकच मिनिट ही परीक्षा आहे त्यामुळे विभागवार यादी न करता गुणवत्तेनुसार एकच निवड यादी करून प्रवेश देणे गरजेचे आहे.

तथापि अशी प्रवेश पद्धती अमलात येत नसल्याने व 70:30 च्या धोरणानुसार प्रवेश होत असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य भरडले जात आहे.येथील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे भविष्य अंधारात अंधारात टाकणारा 70:30 असंविधानिक कोठा रद्द करणे नितांत गरजेचे आहे.

यासंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते हे माध्यमाने आवाज उठवला आहे.मात्र अद्याप पर्यंत यासंदर्भात राज्य शासनाने कुठलेच धोरण जाहीर केलेले नाही.
तरी सदरील निवेदनाच्या द्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की,

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी 70:30 चा कोठा शासनाने तातडीने रद्द करावा.या निवेदनावर अँड.सूभाषराव सोनकांबळे,गफारखान पठाण,प्रशांत जाभाडे,आकाश सांगविकर,अजय भालेराव,दिलीप भालेराव,शरद बनसोडे,मल्हारी सोनकांबळे,सय्यद तबरेज,मोहम्मद पठाण,सय्यद नौशाद,शाहरूख पठाण,नूर मोहम्मद,सचिन बानाटे,मूज्जमील खूरेशी,बालाजी मस्के,धम्मानंद कांबळे आदींचे नांवे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here