नांदेड – महेंद्र गायकवाड
कुंडलवाडी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. सौ. अरुणा कुडमुलवार यांना शासनाने जातवैधता प्रमाणापत्रा अभावी अपात्र केल्यानंतर त्यांचा कारभार नगराध्यक्षांचे पती व विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांच्याकडे देण्यात आला होता परंतु जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सदस्यांमधून नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहीर केल्याने सौ नंतर श्री कडे अध्यक्ष पदाचा कारभार असणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.
कुंडलवाडी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सन 2016 मध्ये प्रत्यक्ष लोकशाही पध्दतीने थेट जनतेतून झाली या निवडणुकीत भाजपच्या सौ अरुणा कुडमुलवार यांनी काँग्रेसच्या अर्चना पोतनकर यांचा पराभव केला. नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवग महिलेसाठी राखीव होते.
त्यामुळे सुरुवातीपासुन जात वैधता प्रमाणपत्रावरून वादंग उठले होते शेवटी हे प्रकरण न्यायालयात व मंत्रालयात पोहचले. या प्रकरणाचा निकाल ७ सप्टेंबर रोजी लागला असून नगराध्यक्षांना अपात्र करण्यात आले.परंतु त्यांचे पती उपाध्यक्ष यांच्या कडे कारभार देण्यात आला .पण तोही तातपुरताच ठरला.दिनांक 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी विशेष सभेची नोटीस काढून पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारणे.त्याच दिवशी 2 वाजेनंतर पीठासीन अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन पत्राची छाननी करणे.5 वाजेपर्यंत फेटाळण्यात आलेलं नाव व सूचना. सदरील विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.
पीठासीन अधिकारी म्हणून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 ऑक्टोबर रोजी 11 वाजता सदस्यांमधून अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. नगरपालिकेत भाजपचे 10 ,कॉंग्रेसचे 4 व शिवसेनेचे 3 सदस्य आहेत.