बस-ट्रेनच्या धडकेत २० प्रवासी ठार…२९ जण जखमी

न्यूज डेस्क – बँकॉक चाचॉंगेसाओ प्रांतात रविवारी भरधाव बसने ट्रेनला धडक दिल्याने मोठा अपघात घडला असून या अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू तर २९ जखमी झाल्याची बँकाक पोस्ट या वृत्तसंस्थेने दिली आहे.

आज सकाळी ८.०५ वाजता बस प्रवासी बौद्ध लेंटचा समारंभासाठी मंदिरात जात असताना बँकॉकच्या पूर्वेस ५० किलोमीटर अंतरावर खलॉंग क्वेंग क्लान रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात घडला असून. ६५ प्रवाशांना घेऊन बस जात असताना अचानक ट्रेननं धडक दिली अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चाचेओंगसाओ परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यानं समोरचं सगळं अंधुक दिसत होतं. त्यामुळे बस चालकाला समोरून ट्रेन येत असल्याचं समजलं नाही आणि हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

ही बस रेल्वे लाईन क्रॉस करत असताना रेल्वेनं अचानक बसला धडक दिली आणि मोठी दुर्घटना घडली. बँकॉकपासून ५० किलोमीटर अंतरावर पूर्व भागात ही घटना घडली. चाचेओंगसाओ जिल्हा मुख्य अधिकारी पृथुआंग युकासेम यांनी थायलंडमध्ये स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार या अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन विभाग आणि यंत्रणा कामाला लागली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे बस चालकाला ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here