शेतकऱ्याचा अडीच एकराच ऊस जळून खाक…कारंजा तालुक्यातील कामरगांव येथील घटना…

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगांव येथे शेतातील अडीच एकराचा ऊस जळून खाक झाल्याची घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडली.

कामरगांव येथील शेतकरी सुधाकर पूंड यांनी अडीच एकरा मध्ये ऊसाची लागवड केली होती मात्र काल रात्रीच्या सुमारास ऊसाला अचानक आग लागल्याने त्यांच्या शेता मधील अडीच एकर शेता मधील ऊसा अचानक आग लागल्याने त्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

मात्र ही आग नेमकी कशी लागली यांचे कारण मात्र अस्पष्ट आहे. त्यांच्या या शेतातील झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी शेतकरी सुधाकर पुंड यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here