कोगनोळी येथील हणबरवाडी येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती उत्साहात संपन्न…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील हणबरवाडी म्हणून परिचित असलेल्या परिसरात महालक्ष्मी यात्रे निमित्त दिनांक 24 रोजी जनरल बैलगाडी शर्यती स्पर्धा आयोजित केल्या होत्या.प्रारंभी या शर्यतीचे उद्घाटन आडी गावचे सुपुत्र बंदूकअण्णा पाटील,सदाशिव कागले,नामदेव पोवाडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.

सदर स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन शर्यतीचा आनंद लुटला होता. तर शर्यतीचे शोकीन असणाऱ्या नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.या शर्यती मध्ये जनरल बैलगाडी स्पर्धेत प्रथम क्रमांक बाळू हजारे [शिरूर ता.अथणी] ,द्वितीय क्रमांक बंडा खिलारे [दानोळी]आणि तृतीय क्रमांक पृथ्वीराज हवालदार [हरिपुर] यांचे नंबर आले.

तर घोडा बैल शर्यत स्पर्धेत प्रथम क्रमांक तानाजी घाडगे [पाचगाव] द्वितीय क्रमांक युवराज खोत [आडी ता.निपाणी ]तृतीय क्रमांक अरुण खोत [हणबरवाडी ता.निपाणी ]यांचे नंबर आले. यामध्ये बिनदाती घोडा बैल शर्यती स्पर्धेत प्रथम क्रमांक आनंदा खोत [हणबरवाडी ता.निपाणी] द्वितीय क्रमांक नागाप्पा खोत [हणबरवाडी ता.निपाणी ]तृतीय क्रमांक पुंडलिक ढोल [लक्ष्मीवाडी ]असे नंबर आले.

त्याचबरोबर घोडा गाडी शर्यती स्पर्धेत प्रथम क्रमांक किशोर पाटील [भिवशी ता.निपाणी]द्वितीय क्रमांक सचिन देसाई [वसवडे ]तृतीय क्रमांक रामा कजार [निगवे खालसा] सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी हणबरवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करून परिश्रम घेतले होते.

यावेळी बाळासाहेब कागले सर, नागेश खोत,धनाजी कागले, सचिन पाटील ,सुनील घुगरे, आरूण खोत, बाळासाहेब खोत, युवराज खोत, सुरेश खोत ,सागर पाटील, अनिकेत खोत, पांडुरंग कागले ,साताप्पा शिंदे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here