बुलढाणा – अभिमान शिरसाट
बुलढाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू ने एंट्री केली असून हजारो पोल्ट्री धारक शेतकरी तथा पोल्ट्री व्यवसाय हादरले आहेत. पोल्ट्री व्यवसाय मध्ये आघाडीवर असलेल्या चिखली तालुक्यात भानखेड येथील 22 जानेवारीला कोंबड्या मृत पावल्या होत्या त्यामुळे दक्ष असलेल्या पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर पर्यंत क्षेत्र प्रतिबंधित अलर्ट झोन म्हणून जाहीर केले,
यातील मृत कोंबड्यांच्या नमुन्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव आला असून चिखली तालुक्यातील भानखेड परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांना लवकरच शासनाच्या निर्देशानुसार दयामरण देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.