आंबेडकर स्मारकासाठी करावे लागत आहे उपोषण…..!
पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट….
बुलढाणा :- अभिमान शिरसाट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा व स्मारकसाठी सम्राट संघटनेकडून बुलढाणा शहरातील हिरोळे पेट्रोल पंपाशेजारी जागेची मागणी केली असून सदर मागणीला वंचित बहुजन आघाडी, टायगर ग्रुप ,चंद्रमणी नगरातील रहिवासी, देशपांडे लेआउट क्रीडा संकुल रोड मधील रहिवासी, भीम नगर वार्ड क्रमांक दोन मधील रहिवासी,
राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा शहर, युवा क्रांती ग्रुप बुलढाणा , शहराला लागून असलेले मौजे ग्राम जांभरून येथील नागरिक ,पाचशे योद्धा ग्रुप बुलढाणा, सावित्रीबाई फुले नगर बुलढाणा, आंबेडकर नगर बुलढाणा, तक्षशिला युवा ग्रुप, इंदिरा नगर, यशवंत नगर बुलढाणा ,मोताळा तालुक्यातील रहिवासी, भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा, जिल्ह्यातील
तथा शहरातील तत्सम पुरोगामी विचार धारा जोपासणाऱ्या मंडळींनी सदर जागा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी मिळण्यासाठी सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात यांच्या मागणीला समर्थन केले असून सर्वांनी जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी ,पालक मंत्री यांना निवेदन सादर करून सर्वांनी खरात यांच्या

बाबासाहेबांच्या पुतळ्याची व स्मारकाची मागणी योग्य व समाज हिताची असून सर्वांनी समर्थन केले आहे. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की, एवढ्या लोकांनी खरात यांचे सह निवेदन देऊन सुद्धा नगरपरिषद प्रशासनाने सदर विषयाचे गांभीर्य न ओळखता मौन पाळून कुठल्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे दिनांक 30 मार्च 2021 पासून
आशिष खरात यांनी सम्राट संघटनेच्या माध्यमातून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
या बाबत सविस्तर असे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा तथा स्मारक शहरात उभारून शहराच्या सौंदर्य कारणासह येणाऱ्या पुढील पिढीला महामानवांचा आदर्श व प्रेरणा मिळावी व शहराच्या सौंदर्य करणात भर पडावा या उदात्त हेतूने शहरातील हिरोळे पेट्रोल पंपा शेजारी नगर परिषद च्या मालकीची जागा
पूर्णाकृती पुतळ्यास साठी व स्मारकासाठी मिळावी या हेतूने सम्राट संघटनेने तथा भीम प्रेमी जनतेने जागा मिळण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच नगरपरिषद प्रशासनाने जागा दिल्यास कुठल्याही लोकप्रतिनिधीचा तसेच नगर परिषद च्या कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचाही निधी न घेता लोकवर्गणीतून काम पूर्ण करण्याचे खरात
यांचेसह विविध निवेदन कर्त्यांनी निवेदनात नमूद केले.परंतु पुतळ्यासाठी व स्मारकासाठी जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनासह शासन प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी तथा स्मारकासाठी मृग गिळुन गप्प असून उदासीन असल्याचे दुर्दैवी चित्र पहावयास मिळत आहे.
या ठिकाणी प्रश्न असा पडतो की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत च्या सर्वच निवडणुकीत बाबासाहेबांच्या नावाचा फक्त बोलबालाच का…? बाबासाहेबांच्या पुतळा तथा स्मारकाविषयी सर्वच उदासीन का …? असे एक नाही अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
जर स्मारक तथा पुतळ्या विषयी नगरपरिषद प्रशासन असेच उदासीन राहिल्यास आंबेडकरी जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल व होणाऱ्या दुष्परिणामांचा सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील. पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही मोठी शरमेने मान खाली घालणारी गोष्ट ठरेल…! कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग व
परिश्रमामुळे गावकुसाबाहेरील समाज गावात येऊन सन्मानाने जगायला लागला ,झोपड्यात राहणारा हक्काच्या घरात राहायला लागला, ज्यांनी एवढे भरभरून दिले त्या महामानवांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी उपोषण आंदोलन करावे लागते ही पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्यासाठी खूप लाजिरवाणी बाब आहे. नगर परिषद प्रशासनाने
सदर जागा पुतळा तथा स्मारकासाठी न दिल्यास संपूर्ण आंबेडकरी समाजाचा अनादर ठरेल…! व याचे दुष्परिणाम उद्भवलन्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने बौद्धांच्या भावनांशी खेळू नये अशी चर्चा आंबेडकरवादी जनतेत होत आहे…!