बुलढाणा नगरपरिषद महामानवांच्या पुतळ्यास जागा देण्यास उदासीन…

भविष्यात नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलनाची शक्यता

बुलढाणा – अभिमान शिरसाट

कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तथा मानव मुक्तीचे आद्यक्रांतीकारक ,युगपुरुष ,बोधिसत्व ,महामानव ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सन 1996 – 97 च्या दरम्यान बुलढाणा शहरात बसवण्यात आले पण कला संचालन विभाग, पुणे यांनी दोन्ही पुतळे दोषपूर्ण असल्याचा निर्वाळा देऊन प्रमाणपत्र दिले आणि दोन्ही पुतळे हटविण्यात आले.

दोन्ही पुतळे परत बसविण्यासाठी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आंदोलने करीत आहे आणि प्रशासन मात्र गांभीर्याने घेताना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
दोन्ही महामानवांचे पुतळे शहरात बसवल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल व शहराला एक वेगळेपण येईल.

वेळोवेळी महापुरुषांच्या नावाचा गाजावाजा करून राजकारण करणारे नेते मंडळी तसेच प्रशासनातील जबाबदार अधिकारी सुद्धा पुतळे बसवण्यासाठी उदासीन असल्याचे दुर्दैवी चित्र असून शिव प्रेमी तसेच भीम प्रेमी जनतेच्या भावनांशी प्रशासनाकडून चालवलेला खेळ पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण गंभीर विषयावर तथा नगरपरिषदेच्या उदासीन धोरणावर सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात यांनी दखल घेत तथा लक्ष वेधत पुतळे बसवण्यासाठी हिरोळे पेट्रोल पंपाशेजारी नगर परिषदेच्या मालकीची जागा मिळण्यासाठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष सर्व सभापती ,नगरसेवक यांना प्रतिलिपी निवेदन दिले.

छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पूर्वनियोजित जागेचे क्षेत्रफळ लक्षात घेता पुतळा तथा स्मारकासाठी सम्राट संघटनेने सुचवलेली जागा योग्य असून तेथे भव्य पुतळा तथा स्मारक उभे राहू शकते असे मत बुलढाणा जिल्ह्यातील

शिवप्रेमी – भीम प्रेमी जनतेचे असल्याचे दिसत आहे. सम्राट संघटनेने मागणी केलेली जागा योग्य असून या मागणीच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील संपूर्ण समाजाचा सम्राट संघटनेला पाठिंबा सुद्धा मिळत आहे. प्रशासनाने जर गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही

व होणाऱ्या दुष्परिणामास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील असा सूर शहरात होत असलेल्या युवक तथा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरू असलेल्या गुप्त बैठकांमधून निघत आहे. नगरपरिषद प्रशासनाने सदर विषयाचे वेळीच गांभीर्य ओळखून तात्काळ पुतळे बसवावे अशी चर्चा शिवप्रेमी – भीम प्रेमी जनतेकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here