बुलढाणा | चिखलीत सशस्त्र दरोडा…इलेक्ट्रॉनिक्स दुकान मालकाची हत्या…आरोपी फरार…

फोटो -सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. काल रात्री चिखली शहरातील मध्यवर्ती असलेल्या जयस्तंभ चौकातील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात सशत्र दरोडा टाकून दुकान मालकाची हत्या करून दरोडेखोर पसार झालेत. सदर घटनेचा थरार हा cctv कैद झाला असून चिखली पोलीस दरोडेखोरांचा कसून तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चिखली शहरातील गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर काल रात्री 9.45 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोघा दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच तडफडून मृत्यू झालाय. ही संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली असून शहरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तातडीने पोलीस तपास सुरू केलाय.

चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट हे रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाचे मुख्य शटर बंद करून आतमध्ये थांबले होते. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरताच त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने आणि तलवारीने हल्ला केला. या झटापटीत ते दरोडेखोर रोख रक्कम लुटून फरार झालेत. जमिनीवर पडलेले कमलेश पोपट यांनी तशाच जखमी अवस्थेत आपल्या मोबाईल फोनद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांन कळताच त्यानंतर लगेचच कमलेश पोपट यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here