बौद्ध धम्म सदाचार आणि लोककल्याणाचा जीवन मार्ग…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून जागतिक, ऐताहासीक धम्मक्रांतीकरून विविध धर्मात सामाजिक परिवर्तन घडवून आणले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला बौद्ध धम्म सदाचार, बंधुभाव, समता, स्वातंत्र्य, न्यायाचा मार्ग असून लोककल्याणाचा जीवन मार्ग आहे.

असे प्रतिपादन प्रा. बालाजी आचार्य यांनी रविवार दि 25 ऑक्टोबर रोजी अहमदपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजारोहण प्रसंगी नियोजीत कार्यक्रमात केले
अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे होते तर ध्वजारोहक प्रा बालाजी आचार्य प्रमुख उपस्थिती प्रा डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी ,संयोजक रिपाईचे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाघबंर ,अशोक सोनकांबळे ,अ‍ॅड सुभाष सोनकांबळे,धर्मपाल गायकवाड, बालाजी वाघमारे, पी पी गायकवाड, दयानंद वाघमारे,

आवाज बहुजनाचा न्यूज चे पत्रकार शिवाजी गायकवाड, पत्रकार मेघराज गायकवाड ,राजेंद्र सोमवंशी, दुगाने सर ,राहुल तलवार, भगवान ससाने,सय्यद असलम ,शेख कलीम, शेख बाबू ,राहुल गायकवाड आदिची होती यावेळी बाबासाहेब कांबळे यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर प्रा बालाजी आचार्य यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी सामुहीक त्रीशरण, पंचशील घेण्यात येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने मार्गदर्शनपर विचार मांडताना प्रा बालाजीआचार्य म्हणाले की डॉ बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध धम्म समाजात आणि देशात बंधुभाव ,समता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयोगी तत्वज्ञान आहे.

परंतु धम्माचे आचरण अतिशय काटेकोरपणे झाले पाहिजे धम्म माणसाच्या,त्याचप्रमाणे जगाच्या प्रगतीचा, सामाजिक नितीचा मंगल व सार्वभौम मूल्य जपणारा जीवनमार्ग आहे. धम्माच्या आचरणाने आपले कल्याण आणि उद्धार होईल असेही प्रतिपादन केले यावेळी डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनीही मनोगत मांडताना डॉ आंबेडकर पार्क च्या सुशोभिकरणासाठी न प ने ठराव घेतल्याचे सांगीतले त्यानंतर अध्यक्षीय समारोप बाबासाहेब कांबळे यांनी केला.

तर प्रस्ताविक आभार प्रदर्शन संयोजक अरुणभाऊ वाघबर यांनी केले. यावर्षी आंबेडकरी अनुयायानी घरीच महामानवास अभिवादन करून महामारी रोखण्यासाठी शासनाला सहकार्य केल्याचे दिसून आले मोजक्याच आंबेडकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्त्यानी फिजीकल अंतर ठेऊन अभिवादन आणि पंचशील धम्म ध्वजारोहन करुन आदर्श समाजासमोर ठेवला या बदल्ल सर्व स्तरातून आंबेडकरी समाजाचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here