मुंबईत बसपाची प्रदेश बैठक संपन्न, १३ जुलै ला आरक्षणासाठी आंदोलन…

शरद नागदेवे

मुंबई महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या मुंबईच्या चेंबूर येथील प्रदेश कार्यालयात आज महाराष्ट्रातील प्रदेश स्तरीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला बसपा चे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऍड विरसिंग साहेब, दुसरे प्रभारी प्रमोदजी रैना साहेब व प्रदेशाध्यक्ष ऍड संदीपजी ताजने प्रामुख्याने उपस्थित होते.

आज प्रदेशाध्यक्ष ऍड संदीपजी ताजने व प्रदेश महासचिव नागोरावजी जयकर ह्यांचा वाढदिवस असल्याने कार्यक्रमाच्या सुरवातीस त्यांचे स्वागत करुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

नेत्यांचे स्वागत व अभिवादन…

या प्रसंगी सुरुवातीस सरकारी कोरोना च्या महामारीत ज्या कार्यकर्त्यांचे निधन झाले त्या सर्वांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ऍड विरसिंगजी, प्रमोद रैनाजी, ऍड ताजनेजी ह्यांचे कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.

या प्रसंगी ऍड विरसिंगजी म्हणाले की बसपा हा राजकीय पक्षासोबतच महापुरुषांची मोव्हमेंट चालविणारा पक्ष असल्याने जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी समर्पण व त्यागाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने संगठण बांधणीवर जोर द्यावा व त्यात युवकांचा जास्तीत जास्त समावेश करावा असे आवाहन केले, शेवटी जनतेच्या हितासाठी बसपा 13 जुलै ला पदोन्नतीतील आरक्षणा साठी राज्यस्तरावर आंदोलन करेल अशी घोषणा केली.

या प्रसंगी प्रमोदजी रैना ह्यांनी महापुरुषांचे जन्मस्थळ म्हणून देशभरात महाराष्ट्र ला मोठा सन्मान आहे, उत्तर प्रदेशा सारखी सदस्य नोंदणी करुन शक्ती उभी केल्यास नक्कीच तो सन्मान महाराष्ट्रला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

ऍड संदीपजी ताजने ह्यांनी कोरोनावर मात करणाऱ्या व न घाबरणार्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून काँग्रेस-भाजपा पासून ओबीसी ह्यांना सावध करण्याची जबाबदारी बसपा च्या कार्यकर्त्यांनी घेतली, त्यामुळे ओबीसिंच्या आरक्षणाचा खरा क्षतृ कोण हे अखंड निळ्या झेंडयच्या शक्तीने 13 जुलै ला राज्य सरकारला दाखवून द्यावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
यावेळी प्रदेश महासचीव पंडित बोर्डे, नागोराव जयकर, रामसुमेर जैस्वार, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार ह्यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश महासचिव मनोज इंगळे ह्यांनी, प्रास्ताविक प्रदेश महासचिव ऍड सुनील डोंगरे ह्यांनी केले, तर समारोप प्रदेश सचिव अविनाश वानखेडे ह्यांनी केला. या प्रसंगी राज्यातील सर्वच जिल्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी ज वि पवार नवाच्या निवृत्त अधिकाऱ्याने व बबन बनसोडे नावाच्या वंचित च्या नेत्याने बसतात प्रवेश केला, त्यांचे बसपा नेत्यांनी स्वागत केले.

नागपुरातील प्रमुख प्रदेश पदाधिकारी ज्यात प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, डहाट, बाबूल डे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष द्वय राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, माजी शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, शहराध्यक्ष इंजि राजीव भांगे, उमेश मेश्राम, कामठी चे किशोर गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here