नागपूर! रामबाग परिसरात सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या…

फोटो -सौजन्य गुगल

नागपूर – शरद नागदेवे

मादक पदार्थाचा सेवनापासून अलिप्त राहण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली.संबंधीत घटना नागपूर येथील रामबाग परिसरात लांगमार्च चौक पुलीस चौकी समोर घडली.ईमामबाडा पोलीस स्टेशनतील पोलीसांनी ४ अल्पवयीन मुलांना अटक केली.मुतकाचे नाव सुनील संभाजी जवादे असून त्यांचे वय (४६) वर्षाचे होते.

सुनील जवादे समाता सैनिक दलाचे सक्रीय कार्यकर्ते होते.कॉटन मार्केट मध्ये भाजीपाल्यांची दलाली करायचे.सामाजसेवेची आवड असल्यामुळे बौद्ध विहार जवळ नशा करणाऱ्यांना व असामाजिक तत्वांना लोकांना समज देत असतं असल्याने परिसरात असामाजिक कुत्य करणाऱ्या लोकांना अडचण निर्माण होत असे.

सुनील जवादेनी आरोपिंना बौद्ध विहारा समोर बसून गांजा पीत असतांनी ५ दिवसा आधी हटकले होते.व पोलीस तक्रार करण्याबाबत त्यांना धमकावले होते.माहितीनुसार आरोपिंचा काही दिवसा आधी सुनीलच्या पुतण्या सोबत वादविवाद झाला होता.१५ ते १८ वर्षांच्या अल्पवयीन चारही आरोपींनी सुनीलवर पाळत ठेऊन रात्रभर परिसरात बसून नशा केली.

सकाळी ४:३० सुनील मार्केटला जायला निघाला यादरम्यान, आरोपिंनी सुनीला वीळखा घातला व तलवारीने व चाकुने वार करुन जख्मी केले.आराडा, ओरड झाल्यानी परिसरातील नागरिक जागे झाले.तेव्हा चारही आरोपी फरार झाले होते.सुनीलला उपचारासाठी मेडीकल रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मुत घोषीत केले.घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली.

डीसीपी नुरूल हसन घटनास्थळाची तपासणी केली.काही वेळातच अल्पवयीन आरोपींनि अटक करण्यात आली.१ आरोपी बालीक असण्याची शंका आहे.पोलीस पुढील तपास करीत आहे.या घटनेमुळे जवादेच परिवारचं नाही तर संपूर्ण परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.सुनीलचा निधनानंतर त्यांची पत्नीला मोठा पोहचला आहे.सुनील ला ८ वर्षाचा प्रींस नावाचा लहान मुलगा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here