नागपूर - शरद नागदेवे
हिंगणा – माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे जेष्ठ बंधू, विनोद, प्रमोद बंग यांचे वडील, संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे सचिव जयकिशनजी गोपीकिसनजी बंग यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी हृदयविकाराच्या आजाराने आज दिनांक २९/०९/२० मंगळवार ला रात्री २.०० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर रायपूर हिंगणा येथील स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात भाऊ रमेशचंद्र बंग, शंकरलाल बंग , सतीश बंग , दिलीप बंग तर विनोद बंग , प्रमोद बंग मुले व रेखाबाई राठी मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.
जयकिसनजी बंग हे मोठे बाबूजी म्हणून परिसरात ओळखले जायचे रमेशचंद्र बंग यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांचा भक्कम पाठिंबा होता. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे हिंगणा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.