वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन २० फेब्रुवारीला – परमात्मा एक आनंदधामचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

परमात्मा एक आनंदधाम, रामटेकचे संस्थापक, अध्यक्ष तथा राज्य शासनाकडून महात्मा गांधी व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत श्री. लक्ष्मणराव मेहर यांचे मार्गदर्शनात रविवार, २० फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ११ वाजता ‘परमात्मा एक आनंदधाम, रामटेक’ येथे फक्त परमात्मा एक सेवकांच्या मुला-मुलींकरिता वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळाव्याचा मोठ्या संख्येने सेवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मणराव मेहर यांनी आवाहन केले आहे.

या वर-वधू परिचय मेळाव्याचे प्रमुख आयोजक बजरंग मेहर असून, कार्यक्रमाचे आयोजक कचरू माथरे, अध्यक्ष, विवाह सोहळा समिती हे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून परमात्मा एक आनंदधामच्या माध्यमातून रामटेक तसेच परिसरात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून या सामाजिक उपक्रमाला खंड पडला होता. मात्र, परिस्थिती सुरळीत होत असल्याने कोरोना नियमाचे पालन करून आयोजन करण्यात आले आहे.

एका परमेश्वराचा समाजाला परिचय करून देणारे तसेच वाईट व्यसन व अंधश्रद्धेतून मुक्त करणारे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनानी परमात्मा एक सेवकांमध्ये विविध जाती, धर्माचे लोकं एकत्रित आलेले आहेत. त्यांना आपल्या पाल्यांच्या विवाहाप्रसंगी योग्य जोडीदार शोधताना त्रास होऊ नये, म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आयुष्यभर समाजातील गोरगरिब, कष्टकऱ्यांसाठी निष्काम सेवाकार्य केले. हाच आदर्श घेत त्यांच्याच प्रेरणेतून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याने मोठ्या संख्येने सेवेकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मणराव मेहर यांनी केले आहे.

परमात्मा एक सेवकांमध्ये आपल्या मुला मुलींचे लग्न जोडतांना आपला जावई किंवा आपली सून परमात्मा एक कुटुंबातीलच असावे, असा विचार मनात असतो. अशा स्थळांच्या शोधात कुटूंबाचा अनमोल वेळ वाया जाऊ नये आणि मुलां-मुलींचे सुरळीत व व्यवस्थित स्थळी लग्न होण्याकरिता अडचण व धावाधाव होऊ नये, याकरिता परमात्मा एक आनंदधाम रामटेक अविरत कार्य करीत आहे. लक्ष्मणराव मेहर, संस्थापक अध्यक्ष – परमात्मा एक आनंदधाम, रामटेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here