गणितातील समस्यांकरिता ब्रेनलीने ‘मॅथ सॉल्वर’ लाँच केले…

बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताच्या समस्या असतात. पण जेव्हा ते या समस्येवर ऑनलाइन मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अडचणीत आणखी वाढ होते. ब्रेनली या विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, ३३ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी गणित हा आव्हानात्मक विषय असल्याचे निदर्शनास आले होते. सुटीतला होमवर्क करताना यासाठी सर्वाधिक मदत लागत असल्याचे त्यांनी म्हटले. ही गरज पूर्ण करत ब्रेनली भारतात मॅथ सॉल्वर लाँच करत आहे. हे नवे टूल २४/७ उपलब्ध असून यूझर्सना गणितातील सर्वात जटील समस्यांचे निराकरण करण्यात मदत मिळेल.

ब्रेनली मॅथ सॉल्व्हरद्वारे एखाद्या जटील गणिताचा फोटो किंवा मॅन्युअली डिव्हाइसच्या टचस्क्रीनवर इक्वेशन लिहून पाठवल्यास त्यावर तत्काळ टप्प्या-टप्प्यानुसार मार्गदर्शन मिळते. एआयद्वारे समस्येचे त्वरीत विश्लेषण होते आणि तपशीलवार स्पष्टीकरण देऊन सोल्युशन प्रदान केले जाते. अधिक आकलनासाठी ग्राफिकल/ व्हिज्युअल सादरीकरणाद्वारे मदत केली जाते.

ब्रेनलीच्या लर्निंग टूल्सच्या स्यूटचा भाग म्हणून सुरु झालेले मॅथ सॉल्वहर सर्व अँड्रॉइड मोबाइल आणि टॅबलेट डिव्हाइसवर उपलब्ध असेल. वर्षाच्या सुरुवातीला लाँच झाल्यानंतर अमेरिकेतील बाजारात त्याचे जोरदार स्वागत झाले. हे टूल गणितासाठी ऑनलाइन दर्जेदार मदतीसाठी संघर्ष करत आहेत, अशा भारतीय विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरेल.

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, “भारतात सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे त्यांना मदतीसाठी फक्त ऑनलाइन स्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे गणितासारख्या जटील विषयात चांगली मदत मिळणे कठीण आहे. आम्हाला विश्वास आहे की, हे नावीन्यपूर्ण सोल्युशन, गणिताच्या दहशतीऐवजी त्याचे सौंदर्य समजून घेण्यास मदत करेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here