Breaking|बिबट कातडीसह चौघांना घेतले ताब्यात…सापडा रचून सिनेस्टाईल केली एलसीबीने कारवाई…वाचा कुठे झाली कारवाई

भंडारा : बिबट्याच्या कातडीसह चौघांना मोठ्या शिताफीने सिनेस्टाइल ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एलसीबीच्या पथकाने केली. या कारवाईत बिबट्याची कातडी, तीन मोटरसायकल, चार मोबाईलसह चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून वृत्त लिहीपर्यंत कारवाई सुरूच आहे.

◆ पंकज ईश्वर दिघोरे (२५) सुभाष वार्ड – कोंढा, लक्ष्मीकांत शेशमंगल नान्हे (२९) रुक्मिणीनगर खात रोड भंडारा, दुर्योधन सिताराम गहाणे (३२) आमगाव (बु), योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे (४१) सिरेगाव (सानगडी) ता. साकोली असे बिबट्याच्या कातडीसह ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. ही कारवाई भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात मोठ्या शिताफीने करण्यात आली.

◆ एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना त्यांच्या खबरीकडून एक गुप्त माहिती मिळाली की, साकोली तालुक्यातील काही व्यक्तींकडे वाघाची कातडी आहे. त्या कातडीच्या विक्रीचा सौदा नागपूर येथील काही व्यक्तींसोबत २० कोटी रुपयांमध्ये झाला आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक कंकाळे यांनी सापळा रचून फंटरच्या माध्यमातून कातडीचा ५ कोटी रुपयात सौदा केला.

यानंतर या वाघाच्या कातडी विक्रेत्यांना रंगेहात पकडण्यासाठी एलसीबीच्या पथकाने तीन वेगवेगळ्या टीम तयार करून साकोलीत दबा धरून बसले. त्यानंतर या टीममधील अधिकारी खबरीच्या संपर्कात होते. दिवसभर ही टीम वाघ कातडी विकणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात होती. मात्र, त्यांनी एलसीबीच्या पथकाला दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

◆ शेवटी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास या कातडी विक्रेत्यांनी एलसीबीच्या फंटरला (पथकाला) बोदरा – पिंडकेपार रस्त्यावर बोलविल्या. कातडी विक्रेत्यांकडे जाण्यासाठी एलसीबीचे एक कर्मचारी खरेदीदार झाले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक तूरकुंडे हे वाहनचालक म्हणून सापळ्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी कातडी विक्रेत्यांपर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांनी सौदा करण्यासाठी या फंटरला जंगलात बोलविले.

मात्र, त्यांनी एलसीबीच्या पथकाने वनविभागाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवून त्यांना जंगलाच्या बाहेर बोलून त्यांच्याशी वाघाच्या कातडी संदर्भात प्रत्यक्षात चर्चा केली. यावरून तिथे पाच कोटीचा सौदा तीन कोटी रुपयांमध्ये पक्का झाला. आणि पैसे सकोलीतील त्यांच्या सहकार्यकडे असल्याचे सांगितले. याची खातरजमा करण्याकरिता कातडी विक्रेत्यांपैकी दोन सहकारी पैशासाठी साकोली येथे पोहचले.

यावेळी साकोलीत दबा धरून बसलेल्या एलसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही माहिती फंटर म्हणून गेलेल्या एपीआय तूरकुंडे यांना देऊन तेथील अन्य दोघांना ताब्यात घेतले. या चौघांकडे असली शिकार केलेल्या वन्य प्राण्यांची कातडी हस्तगत केली. ती वाघाची नसून बिबट्याची कातळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत तीन मोटरसायकल, चार मोबाइल व बिबट्याचे कातडे असा एकूण सुमारे १२ लाखांचा ऐवज एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने सिनेस्टाईल ताब्यात घेतले.

◆ या कारवाईचा वनविभागाला थांगपत्ता नव्हता हे विशेष. यावरूनच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ही कारवाई झाल्यानंतर आरोपी व जप्त केलेले साहित्य विभागाच्या ताब्यात देण्याची कारवाई वृत्तलिहीपर्यंत साकोली येथे सुरू होती.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक तूरकुंडे, पोलीस उपनिरीक्षक उईके, एलसीबीच्या पथकातील रोशन गजभिये, नितीन महाजन, मंगेश मालोदे, सुधीर मडामे, चेतन थुटे, स्नेहल गजभिये, राऊत, विजय तायडे, अमोल, कौशिक, नंदू बोरकर आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here