Breaking | यवतमाळ | आज चार जण नव्याने पॉझेटिव्ह…एकाला सुट्टी…तर १३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 27 : आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेला रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात चार जण नव्याने पॉझेटिव्ह आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गत 24 तासात 134 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


आज (दि. 27) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यात दारव्हा येथील एक महिला, वणी येथील महिला आणि यवतमाळ शहरातील एक महिला व एक पुरुष आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 64 होती. एकाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 63 वर आली. मात्र नव्याने चार पॉझेटिव्ह आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 वर पोहचला आहे.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 138 रिपोर्ट प्राप्त झाले. यात चार जण पॉझेटिव्ह तर 134 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 86 जण भरती आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 266 झाली आहे.

यापैकी तब्बल 191 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात आठ जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 32 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4447 नमुने तपासणीकरीता पाठवले असून यापैकी 4392 प्राप्त तर 55 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4126 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here