Breaking | यवतमाळात २४ तासात सहा मृत्यु…१५१ नव्याने पॉझिटिव्ह…‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’

108 जणांना सुट्टी…आतापर्यंत 50 हजारांच्या वर नागरिकांचे नमुने निगेटिव्ह

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्युच्या संख्येत वाढ होत असली तरी आतापर्यंत 50 हजारांच्या वर नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आजपावेतो एकूण 50844 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून यात विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेतील (व्हीआरडीएल) 28547 नमुने आणि रॅपीड ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे 22297 नमुने निगेटिव्ह आहेत.

गत 24 तासात जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 108 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्या सहा जणांमध्ये यवतमाळ शहरातील 63 वर्षीय पुरुष, 65 आणि 75 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 50 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 151 जणांमध्ये 94 पुरुष व 57 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 29 पुरुष व 12 महिला,

घाटंजी शहरातील एक पुरूष, घाटंजी तालुक्यातील दोन पुरूष, आर्णी शहरातील 13 पुरूष व आठ महिला,आर्णी तालुक्यातील एक महिला, बाभुळगाव शहरातील चार पुरूष व पाच महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरूष व दोन महिला, दिग्रस शहरातील चार पुरूष व दोन महिला, कळंब शहरातील तीन पुरूष व तीन महिला, केळापुर तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील आठ पुरूष व दोन महिला,

महागाव तालुक्यातील एक पुरूष, मारेगाव शहरातील चार पुरूष व दोन महिला, नेर शहरातील सहा पुरूष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील आठ पुरूष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष व पाच महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरूष तसेच यवतमाळ तालुक्यातील एक पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 1063 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये 260 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4820 झाली आहे. यापैकी 3364 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 133 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 338 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 106 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 58725 नमुने पाठविले असून यापैकी 55664 प्राप्त तर 3061 अप्राप्त आहेत. तसेच 50844 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here