Breaking |यवतमाळ | उमरखेड येथे हाय प्रोफाईल जुगार अड्डयावर धाड…३८ जुगारी ताब्यात…४७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त…

सचिन येवले ,यवतमाळ

उमरखेड पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सदानंद वॉर्डातील येथे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून अनेक बडे व्यापारी, नांदेड 
येथील प्रतिष्ठित नागरिक यांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. या जुगारात जवळपास 38 जुगारी यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 9 लाख 38 हजार 970 रुपये नगदी जप्त केले. 


कारवाई विभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी केली. सहायक पोलिस अधिक्षक अनुराग जैन याना गुप्त माहिती मिळाली की उमरखेड येथील सदानंद वॉर्डातील नितीन बंग यांच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या ठिकणी धाड टाकली असता नांदेड व उमरखेड येथील 38 प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, नेते जुगार खेळताना आढळून आले.

या कारवाई 9 नऊ लाख 38 हजार 970 रुपये नदी नगदी जप्त करण्यात आले. तर 65 मोबाईल, 4 मोटर सायकल, तीन चार चाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण 47 लाख 34 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांनी गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सूर आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, रेवन जागृत, उदयराज शुक्ला, प्रकाश चव्हाण, छगन चंदन, मोहन चाटे वसीम शेख, युनुस भातनासे, भावना पोहूरकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here