Breaking | यवतमाळ | चार जण नव्याने पॉझेटिव्ह…पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह…जिल्ह्यात १२ जणांना मिळाली सुट्टी…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि.26, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 12 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 4 जण नव्याने पॉझेटिव्ह आल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रूग्णांची संख्या 64 झाली आहे.

ल्ह्यात गुरूवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रूग्णांची संख्या 72 होती. यापैकी 12 जणांना सुट्टी झाल्यामुळे हा आकडा 60 वर आला. मात्र शुक्रवारी चार जण नव्याने पॉझेटिव्ह आल्यामुळे आयासोलेशन वार्डात तसेच इतर ठिकाणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 64 वर पोहचली आहे.

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये 2 पुरूष तर 2 महिला आहेत. यात दिग्रस येथील 3 जण आणि दारव्हा येथील एकाचा समावेश आहे.आयसोलेशन वार्डात सद्यस्थितीत 88 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रूग्णांची संख्या 262 वर पोहचली असून यापैकी सद्यस्थितीत 64 ॲक्टीव पॉझेटिव्ह तर आतापर्यत 190 जणांना बरे झाल्यामूळे सूट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधीत मृत्यूची संख्या 8 आहे.वैद्यकीय महाविद्यालयाने आज 65 नमूने तपासणीकरिता पाठविले. आतापर्यंत 4374 नमूने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 4254 प्राप्त तर 120 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात एकूण निगेटिव्ह रूग्णांची संख्या 3992 आहे.


जिल्हाधिकाऱ्यांची नेर येथील प्रतिबंधीत क्षेत्राला भेट


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्याच्या इतर तालुक्यात झाल्यामुळे व येथे पॉझेटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे रोज विविध तालुक्यांचा तसेच ग्रामीण भागाचा दौरा करून प्रत्यक्ष आढावा घेत आहे. आज शुक्रवारी त्यांनी नेर येथील प्रतिबंधीत क्षेत्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

वेळी बोलतांना ते म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर तपासणी करावी. तसेच या भागातून आणखी नमुने तपासणीकरीता पाठवावे. पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यन सारीची तसेच आयएलआयची लक्षणे असलेले नागरिक आढळल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती द्या. तसेच सारी आणि आयएलआयची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.


सर्व नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here