Breaking | यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु…११२ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 112 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. मृत झालेल्यांमध्ये आर्णि शहरातील 65 वर्षीय महिला आणि पांढरकवडा शहरातील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 112 जणांमध्ये 70 पुरुष व 42 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील दोन पुरूष, आर्णी तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील चार पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील 13 पुरूष व सहा महिला, यवतमाळ शहरातील सात पुरुष व चार महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरूष,

नेर शहरातील चार पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील चार पुरूष व तीन महिला, कळंब तालुक्यातील एक महिला, महागाव तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील 15 पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरूष व एक महिला, वणी शहरातील सहा पुरूष व 14 महिलांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 790 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 227 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3399 झाली आहे. यापैकी 2462 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 84 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 194 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 195 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 49340 नमुने पाठविले असून यापैकी 46753 प्राप्त तर 2587 अप्राप्त आहेत. तसेच 43354 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here