Breaking|यवतमाळ २४ तासात २३६ जण नव्याने पॉझिटिव्ह…सात जणांचा मृत्यु… आतापर्यंत सहा हजारांच्या वर बरे…६० हजारांच्या वर निगेटिव्ह…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. गत 24 तासात आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 115 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 6140 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 60 हजार 728 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

तर गत 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून नव्याने 236 रुग्णांची भर पडली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 68 वर्षीय व 72 वर्षीय पुरुष तसेच 61 वर्षीय महिला, उमरखेड शहरातील 50 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 50 वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 236 जणांमध्ये 154 पुरुष व 82 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 48 पुरुष व 30 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष, आर्णी शहरातील आठ पुरुष व चार महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, महागाव शहरातील 12 पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील 11 पुरुष व तीन महिला,

पांढरकवडा शहरातील नऊ पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, राळेगाव शहरातील आठ पुरुष व पाच महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील 22 पुरुष व 12 महिला, वणी शहरातील आठ पुरुष व दोन महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, कारंजा शहरातील एक पुरुष तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या एका पुरुषाचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 526 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 726 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 7622 झाली आहे. यापैकी 6140 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 230 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 274 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 69489 नमुने पाठविले असून यापैकी 68350 प्राप्त तर 1139 अप्राप्त आहेत. तसेच 60728 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here