Breaking | विराट कोहलीची मोठी घोषणा ! कर्णधारपद सोडणार…

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी संध्याकाळी मोठी घोषणा केली. विराटने गुरुवारी ट्विटरवर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार, टी -20 क्रिकेट विश्वचषकानंतर विराट कोहली टी -20 सामन्यांमधून कर्णधारपद सोडेल. एकदिवसीय आणि कसोटी संघांचा कर्णधार म्हणून कायम राहील.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होण्यास तयार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा नवा कर्णधार होऊ शकतो. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सोमवारी भारतीय संघातील कर्णधारपदाच्या विभाजनाचे वृत्त फेटाळून लावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here