Breaking । दुचाकीवर असलेल्या गावठी बाँब चा स्फोट…एक ठार एक गंभीर जखमी…अमरावती जिल्ह्यातील घटना…

न्यूज डेस्क – अमरावती जिल्ह्यातील आसेगाव हद्दीतील खैरी दोनोडा या गावाजवळ मोटारसायकल वर गावठी बॉम्बसह जात असताना सायलेन्सरच्या चटक्याने गावठी बाँबचा स्फोट झाल्याने एकाचा जागेवरच मृत्यू झालेला आहे तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात ऊपचाराकरीता पाठवीन्यात आले आहे. घटलेल्या स्फोटामुळे २ कीलोमीटर परीसरात प्रचंड आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शी ने सांगीतले. यामूळे गावात काही काळासाठी दहशत पसरली होती.

प्रतीबंध प्रदीप पवार २२ असे या स्फोटामधे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सदर व्यक्तीकडून गावठी बाँब कोठून व कशासाठी नेन्यात येत होते याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

तर गत अनेक वर्षापासुन या परीसरात वन्य प्राण्यांच्या शीकारीसाठी काही लोक गावठी बाँब चा ऊपयोग करीत असल्याचा गावकर्‍यांनी आरोप केलेला आहे. त्यामूळे प्रकरण चीघळु नये करीता अतीरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शाम घूगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस यंत्रणा गावामधे पाठवीन्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here